Through the Project MPSM works with 4000 Adivasi Women and their families in 20 Gram Panchayats of Trimbakeshwar and Peth Tehsils of Nashik district through 2 cluster managers, 5 field assistants and 20 community resource persons. ‘Making women the focal point of the growth and development of tribal communities’ is the vision of the Project. The Project focuses on livelihood creation and enhancement through sustainable agriculture, agriculture allied enterprises, micro enterprise and entrepreneurship development, institution building and leadership training.
Project awareness and orientation programs were organised, base-line surveys conducted, women’s livelihood aptitude, interests and choices assessed and livelihood alternatives and plans presented. Technology provided for small scale domestic industry, organic agriculture, poultry, goatry, fishery and mushroom units started and self-employment activities supported.
And this has made all the difference in the confidence of tribal women that THEY CAN!
या प्रकल्पांतर्गत आम्ही, नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांतील एकूण वीस ग्रामपंचायतींसोबत काम करीत आहोत, ज्यामध्ये एकूण चार हजार आदिवासी महिला व त्यांच्या कुटुंबांचा समावेश आहे. आमचे दोन प्रभाग व्यवस्थापक, पाच प्रभाग सहाय्यक व वीस प्रेरणासखी वरील दोन्ही तालुक्यांमध्ये प्रकल्प पुढे नेण्याचे काम करीत आहेत.
‘महिलांना आदिवासी समाजाच्या विकास आणि समृद्धीचा केंद्रबिंदू बनविणे’ हेच या प्रकल्पामागचे स्वप्न आणि ध्येय आहे.प्रस्तुत प्रकल्पा- अंतर्गत शाश्वत शेती, शेती-आधारित उद्योग, पूरक लघुउद्योग तसेचउदयोजिकता विकास त्यासाठी संस्था बांधणी आणि उद्योजीकता प्रशिक्षण यांमार्फत आम्ही उपजीविका निर्माण आणि वाढीवर भर दिला गेला आहे. या सर्वांत महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण हा मुख्य उद्देश ठेऊन आम्ही या प्रकल्पाकडे पाहत आहोत.
प्रकल्प सुरु झाल्यापासून जागुरुकता कार्यक्रम, प्राथमिक टप्प्यावरील सर्वेक्षण यांमार्फत महिलांचा विविध उपजीविकेच्या पर्यायांकडे असलेला कल तसेच त्यांना आवडत असलेली कामे जाणून घेऊन त्यांच्यासाठी उपजीविकेचे विविध पर्याय असलेले कार्यक्रम आखून देण्यात आले. कशाची निवड करायची हे प्रस्तुत महिलांवरच सोपविण्यात आले जेणेकरून त्यांचा त्यांनी निवडलेल्या कामामध्ये रस टिकून राहील. आम्ही त्यांना लघु उद्योग, सेंद्रिय शेती , कुक्कुटपालन , शेळीपालन , मत्स्यपालन , आळंबी उत्पादन इत्यादींतून त्यांनी निवडलेल्या उपजीविका उद्योगाला सुरु करण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणासहित फिरते भांडवल उपलब्ध करून देत आहोत यासोबतच उद्योग सुरु केल्यानंतरही आमचे प्रभाग व्यवस्थापक व सहकारी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सहाय्य करीत आहेत.
या सर्वांतून आदिवासी महिलांच्या जीवनात घडून आलेला बदल आम्ही जवळून अनुभवत आहोत. ‘आम्हालाही शक्य आहे!’ हा त्यांच्यात निर्माण झालेला आत्मविश्वासच आम्हाला आमच्या प्रकल्पाचे ध्येय पूर्ण होते आहे याची ग्वाही देऊन जातो.









Very good project. Now days it’s very helpful to poor people for their livelihood. May God bless your services.
LikeLike
Thanks for your support and encouragement. Best wishes.
LikeLike